खेलो इंडिया - बॅडमिण्टन प्रशिक्षण केंद्र नागपुर

केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांनी खेलो इंडिया सेंटर अंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय एक अशा विविध खेळांची एकुण 36 क्रीडा केंद्रे मंजुर केलेली आहेत . यात नागपुर जिल्ह्यातून आपण एकूण सहा (बॅडमिण्टन , ज्युदो , तलवारबाजी , खो-खो , मल्लखांब व धनुर्विद्या आदि ) केंद्रांचे प्रस्ताव सादर केलेले होते , पैकी आपल्या बॅडमिण्टन या क्रीडा प्रकाराच्या सेंटरला दि. 21/05/2021 ला मान्यता मिळाली असून दि. 22/10/2021 रोजी अधिकृत मार्गदर्शन व सुचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार आज या बॅडमिण्टन सेंटरची अधिकृतरित्या सुरुवात विभागीय क्रीडा संकुल , मानकापूर, नागपुर येथे करण्यात आलेली आहे. या बॅडमिण्टन सेंटर मध्ये जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडुंची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फ़त करण्यात आलेली असून खेळाडु व प्रशिक्षक यांची खेलो इंडियाच्या संकेत स्थळावर रितसर नोंदणी करण्यात आलेली आहे . या सेंटरकरीता केंद्र शासनामार्फ़त प्रथम वर्ष 10 लाख रु. निधी तसेच पुढील तीन प्रती वर्ष पाच लाख रुपये असा निधी उपलब्ध करुन देण्यात येतात . यात ईच्छुक खेळाडुंना प्रशिक्षण देणे , भूतकाळातील जे उत्कृष्ट खेळाडु आहेत त्यांना या सेंटरच्या साह्याने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राच्या प्रवाहात आणणे तसेच त्यांचे टॅलेंटला प्रोत्साहन करुन त्यांना त्यांच्या स्वतःचे सेंटर सुरु करण्यात सहाय्य करणे . तसेच , या सेंटर अंतर्गत विविध पद्धतीचा वापर करुन खेळाडुंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार असून दर तीन महिन्यांनी या खेळाडुंचा प्रगती अहवाल तपासण्यात येणार आहे .हि योजना सलग चार वर्ष सुरु असणार असून सेंटरमधील प्रवेशित खेळाडुंना आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024/28/32 च्या दृष्टीने तयार करण्याचा मूळ उद्देश आहे. नागपुर जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला अनेक उत्तम खेळाडु दिलेले आहेत . ज्यात प्रामुख्याने , मालविका बनसोड ,रितिका ठक्कर इत्यादि खेळाडुंनी नागपुरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केलेले आहे . याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . बॅडमिण्टन क्रीडा प्रकारात तर नागपुर जिल्ह्याने एक वेगळि ओळख निर्माण केली आहे हि देखील एक कौतुकास्पद बाब आहे . खेलो इंडिया अंतर्गत बॅडमिण्टन या खेळाचे सेंटरचे दि. फ़ेब्रुवरी 2022 पासून सुरु करण्यात आले. सद्यस्थितीत बॅडमिण्टन सेंटर मध्ये एकुण 29 खेळाडु प्रशिक्षण घेत असुन यात 13 मुली व 16 मुले यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तज्ञ प्रशिक्षक श्री. अजय दयाल यांचेमार्फ़त खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते.

विभागीय क्रीडा संकुल