नागपूर जिल्ह्याविषयी

नागपूर जिल्हा हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. २००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

इतिहास

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स. १७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स. १८६१ मध्ये नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली. इ.स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनापासून सुरू झाले.१९२५ सालि डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ [आरएसएस] 'ची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारताच्या एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व वऱ्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

हवामान

नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे. नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात. नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वांत वर असतो.उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असते आणि जरी पडले तरी शरीर पूर्ण झाकून बाहेर पडावे लागते. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४५° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३.५ सेल्सियस होते.

अर्थकारण

नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. इ.स. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ॲट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणाऱ्या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपुरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. बुटिबोरीतील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत. शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, हल्दीराम हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, स्वस्त मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपुरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

लोकजीवन व संस्कृती

मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषा।हिंदी व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २१,२९,५०० इतकी होती. काही वर्षांपूर्वी नागपूरला भारताच्या सर्वांत स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वांत हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही, परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे येथे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे होतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते.सन २०१० हे या शोभायात्रेचे ३८वे वर्ष आहे.तसेच पश्चिम नागपुरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली.उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे होतात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात.'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे. इतिहासकाळी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांस वापरून केलेल्या पुतळयाची तान्हा पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणूक काढण्यात येते व मग पुतळ्याचे दहन होते. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. सार्वजनिक उत्सवादरम्यान मानवी वाघ हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो. वाठोडा रिंग रोड येथे भव्य स्वामिनारायण मंदिर उभारण्यात आले आहे. पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- त्यातील सजविलेल्या राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्ती पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- भाविक रामाचा रथ ओढतांना नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. संत्रानगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य- महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे होतात. नागपूरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं.भीमसेन जोशी व इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी येथे बऱ्याचदा आपले कार्यक्रम केले आहेत. मराठी नाटकांना नागपूरमध्ये मोठाच लोकाश्रय मिळतो. कस्तुरचंद पार्क नागपूर नागपूर आकाशवाणी, नागपूर दूरदर्शन ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारित करतात. लोकमत, सकाळ, तरुण भारत व लोकसत्ता ही मराठी दैनिके येथून निघतात. हितवाद,नवभारत,लोकमत समाचार, टाईम्स ऑफ इंडिया यासारखी अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे देखील येथे सहज मिळतात. येथे जवळच असलेल्या बुटीबोरी या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस (प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुतळा) आहे. हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याचा दावा करण्यात येतो.

जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे माहिती

  • ड्रॅगन पॅलेस टेंपल कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार देखील प्रसिद्ध आहेत. या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे.
  • दीक्षाभूमी दीक्षाभूमी दीक्षूभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सन १९५६ दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश व विदेशातील बौद्ध विशेषतः नवबौद्ध येथे अभिवादन करण्यासाठी येतात.
  • सातपुडा बॉटनिकल गार्डन नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अदभुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू
  • सिताबर्डीचा किल्ला सीताबर्डी किल्ल्यात इ.स. १८१७ मध्ये ब्रिटिश व राजे रघुजी भोसले यांच्यामध्ये मोठी लढाई झाली होती. तीत ब्रिटिश जिंकले व नागपूर शहर त्यांच्या ताब्यात गेले.
  • अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. नागपुरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते.

विभागीय क्रीडा संकुल