जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नागपूर मार्फत सुरू करण्यात येत असलेल्या
वेबसाईटकरीता मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. या वेबसाईटच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात दररोज
घडणाऱ्या घडामोडींबाबत आणि नागपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राबाबत अद्यावत माहिती
उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेस
आवश्यक असलेली माहिती वेबसाईटच्या माध्यमातून संगणकावर व मोबाईल फोनवर उपलब्ध
झाल्यास प्रत्येक लहान कामाकरीता सर्वसामान्य नागरिकांना त्या विभागाच्या कार्यालयापर्यंत
प्रत्यक्ष जावे लागणार नाही. क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन, विविध अनुदान योजनांचे व्यवस्थापन
या बाबी ऑनलाईन पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे. तसेच अद्यावत माहिती उपलब्ध
असल्याने कार्यालयीन कामाचा वेग देखील वाढेल. विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष
अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणे शक्य होईल व कार्यालयाचे कामकाजात अधिक
पारदर्शकता आणता येईल. क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे
मन:पुर्वक अभिनंदन..
नागपूर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राबाबतची अद्ययावत माहिती देणारे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे, ही आनंदाची बाब आहे. देश आता सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती करीत असताना क्रीडा जगतात सुद्धा मोठी झेप घेतो आहे. अशात क्रीडा विभागालाही स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. जगाच्या गतीशी स्पर्धा तर करावीच लागेल, शिवाय आपल्या तरूणाईला अधिक मेहनत घेऊन जगामध्ये स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. तरूणाईच्या या प्रयत्नांना पुरक असे वातावरण निर्माण करून देण्याची मोठी जबाबदारी क्रीडा विभागावर आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संकेतस्थळ निर्माण करणे हे अधिक औचित्यपूर्ण आणि नव्या युगाशी जुळविणारे आहे. या संकेतस्थळामुळे लहान-सहान माहितीसाठी प्रत्यक्षात कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचसोबत क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन, विविध अनुदान योजनांचे व्यवस्थापन आदी बाबी ऑनलाईन पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे कामे जलद गतीने होतीलच, त्यासोबतच पारदर्शकताही आणता येणार आहे. क्रीडा विभागाच्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!